नागपुर – शिक्षण संचालक प्राथमिक दिनकर टेमकर यांची २९ नोव्हेंबर रोजी सेंट्रल बिल्डिंग, पुणे येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील आरटीई फाऊंडेशनचे सदस्य असलेल्या शाळांना प्रलंबित प्रतिपूर्ती तातडीने दयावी असे आग्रहाची भूमिका मांडली. थकीत १६०० कोटी मंजूर न झाल्यास हिवाळी अधिवेशनात धडक मोर्चा काढण्याचा इशारा आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडेनी शासनास दिला. तसेच पुष्कळच्या मुद्देह्यावर चर्चा केली, महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे:-
१) प्रलंबित प्रतिपूर्ती १०० टक्के द्यावी. १०० कोटी तातडीने वितरित करून पुन्हा १०० कोटी शासनाकडून मागवून जिल्ह्याना द्यावे. एकूण थकबाकी १६०० कोटीची मागणी शासनास करावी.
२) ८,०००/- दराचे दर पत्रक रद्द करून ३१,५२१/- विनाअट सर्व शाळांना द्यावी.
३) शिक्षणाधिकारी यांचे सोबत जिल्हानिहाय बैठक आयोजित करावी.
४) शाळा सरंक्षण कायदा पारीत करावा.
५) पालकांना फीस भरण्याची सक्ती करावी. तोपर्यंत विद्यार्थी इतर शाळेत ऑनलाईन ट्रान्स्फर करू नये.
६) शिक्षक प्रशिक्षण निःशुल्क द्यावे.
७) सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शन सभा घ्याव्यात.
८) शाळा १ ते ७ सुरू करण्यात संभ्रम दूर करून स्पष्ट आदेश द्यावेत. व इतर RTE फाउंडेशन, भारतचे काळबांडे यांनी सर्व मुद्दे सविस्तर समाजावून शिक्षण संचालकांना सदर पत्र सर्व शिक्षणाधिकारी यांना देण्यास सांगितले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व सर्व मागण्यावर तातडीने शासनास पत्र काढण्यास सांगून संघटना फारच चांगले कार्य करीत आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत असे टेमकर यांनी सांगितले. सोबत डॉ. सहदेव जाधवर आरटीई फाउंडेशन उपाध्यक्ष पुणे, प्रकाश घोळवे आरटीई संघटक सचिव महाराष्ट्र हे होते.