संदीप कांबळे, कामठी
-एका वर्षाच्या कालावधीत 40 लोकांनी केले आत्महत्या
कामठी ता प्र 18:-एप्रिल महिना सुरू होताच आत्महत्येचे प्रमाण वाढले असून या 16 दिवसात चार आत्महत्या झाल्या आहेत त्यात काल एका गर्भवती तरुणीची आत्महत्यांचा समावेश आहे तर मागील एक वर्षाच्या काळात आत्महत्येचे प्रमाण अजूनच वाढले आहे.तेव्हा हे आत्महत्येचे प्रमाण कसे कमी होणार?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत असून हे आत्महत्येचे प्रमाण थांबविण्यासाठी प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.
आजच्या या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्ती हा यशाच्या शिखरावर चढत कौटुंबिक सुखाच्या अपेक्षेत असतो मात्र कुठल्या ना कुठंल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आलेल्या अपयशामुळे त्यांना नैराशेचा सामना करावा लागतो त्यातही पती पत्नीशी आपसात न जुडत असलेले वैचारिक ताळमेळ, अनपेक्षित झालेला कर्जाचा डोंगर , प्रेम प्रकरण, विरहात जगत असलेले जीवन यासारख्या आदी कारणामुळे हताश होऊन शेवटी यांना आत्महत्येचा मार्ग सापडतो त्यातच मागील दोन वर्षात आत्महत्येचे प्रमान खुप वाढलेले आहेत मात्र एकदा मिळालेले जीवन संपवण्यापूर्वी उशिरा का होईना मार्ग निघू शकतो, सुखी कुटुंबासह कर्जाचे डोंगर खचू शकते, विरहित जीवन हे सुखमय होऊ शकते यासाठी संयम बाळगणे गरजेचे आहे. तसेच हे वाढीव असलेले आत्महत्येचे प्रकरण थांबविण्यासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलने गरजेचे आहे.मागिल एक वर्षाचा विचार केला असता 40 जणांनी आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपविली आहे. ज्यामध्ये काही तरुणींचा समावेश आहे ज्यामध्ये खुद्द पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड च्या मुलीचा समावेश आहे.तेव्हा किमान पोलीस विभागाने तरी यासंदर्भात गंभीर्याची भूमिका घेत आत्महत्या करण्यासारखा पवित्रा घेण्यापेक्षा परिस्थितीशी तोंड देण्यासाठी मनोबल मजबूत करणारे मानसोपचार असे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासावी .
विवाह हा दोन जीवांच्या आयुष्यभर सोबत राहण्याचा एक सुंदर अविष्कार आहे. कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न म्हणून ना पसंत वरालाही होकार द्यावा लागतो व त्या अनुरूप जोडीदारा सोबत वैवाहिक जीवन व्यतीत करत असताना आधुनिक जीवनशैली, वाढते ताणतणाव , आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वाद यामुळे दोघांच्या नात्यात वितुष्ट येते आणि हे वितुष्ट समेटाने न मिटत असल्याने या आधुनिक युगातील पती पत्नी मध्ये ताणतणाव निर्माण होत असल्याने हे नवविवाहित जोडपे वर्षभराच्या आतच घटस्फोटाच्या मार्गावर दिसून येतात
आजच्या आधुनिक युगात विशेषता शिक्षण आणि नोकरी लागल्यानंतरच लग्नकार्य केली जातात तोपर्यंत मुलामुलींचे बरेच वय उलटून गेलेले असते दरम्यान कित्येक तरुण तरुणी हे मैत्री रुपी संबंधाला प्रेम प्रकरणाचे रूप देत असल्याने जीवनभराचे साथीदार होण्यासह आकाभाका टाकतात तसेच जीवनभर सोबत राहण्याच्या शपथा खातात मात्र कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा आदर कायम ठेवत कुटुंबाच्या प्रतिष्ठेची जाणीव ठेवत स्वतःच्या प्रेमाचे बलिदान देऊन आई वडिलांनि ठरविलेल्या वरांशी लग्न करण्याची संमती दर्शवून विवाह बंधनात अडकतात मात्र या वैवाहिक जीवनात येत असलेल्या अडचणी व दोघांच्या असमांजस्या मुळे पती पत्नी मध्ये भांडणाचे प्रकार वाढत असून अखेर घटस्फोट घेण्याची पाळी येत असल्याने अनेकांच्या कुटुंबावर आर्थिक बोझा बसत आहे.
आपला जोडीदार समजूतदार असावा अशि अपेक्षा प्रत्येक मुला मुलींच्या मनात असल्याने प्रेम विवाहाची संख्या सुद्धा वाढीवर आहे तर कित्येकांनी पतिस्थितीनुसार आई वडिलांच्या प्रेमाच्या तुलनेत प्रियकराच्या प्रेमाला बाजूला सारून अरेंज मॅरेज ला मान्य करीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत मात्र असे करूनही अनुरूप व समजूतदार जोडीदार मिळत नसल्याने या मुलींचे जीवन फसगत केल्यासारखे होत असून आई वडिलांसाठी डोकेदुखी ठरते.ज्यामध्ये वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या कलहामुळे या नवविवाहितेला किरकोळ कारणामुळे कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत असून पती पत्नी मध्ये होणारे वाद विवाद, मारहाण ,दमदाटी, जीवे मारण्याची धमकी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा त्रास, हुंड्याची मागणी, संशय, पतीकडून आर्थीक मागणी आदी कारणामुळे निर्माण झालेल्या कलहातून घटस्फोटाचा मार्ग पत्करतात आणि या विपरीत मानसिकतेतून शेवटी आत्महत्येचा पवित्रा घेतात इतकेच नव्हे तर बहुधा चिमुकल्या बाळासह आत्महत्या केल्याचा प्रकार घडले आहेत नुकतेच काही महिन्यांपूर्वी कोराडी येथील एका महिला डॉक्टर ने आपल्या बाळासह जीवणयात्रा संपविल्यची घटना निदर्शनास आली होती तर मागील ग्रा प निवडणुकीत महालगाव ग्रा प चे उमेदवार प्रवीण धांडे यांनी ऐन निवडणूक प्रचारादरम्यान आत्महत्या केली तसेच रमानगर च्या एका तरुणाने कोर्टात लागणाऱ्या निकालाच्या भीतीने आत्महत्या केली होती. त्यातच कर्जाच्या डोंगरात असलेले तसेच प्रेमाच्या विरहासह , पतीच्या विरहात एकाकी जीवन जगणारे अशे कित्येकजन आत्महत्तेचा मार्ग शोधतात,मागील एक वर्षात दर महिन्यात दोन तीन आत्महत्या सारख्या घटना घडलेल्या आहेत तर एप्रिल च्या या 16 दिवसात चार आत्महत्या झाल्या आहेत.तेव्हा यासारख्या आत्महत्तेचा प्रकाराला आळा बसावा व विपरीत मानसिकतेत असलेल्या व्यक्तची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी किमान पोलीस विभागातर्फे तरी सेमिनार करण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
कामठी तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढीवर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com