सरस्वती काॅन्वेट मध्ये गुणवंत पालकांचा सत्कार

अमरदिप बडगे

गोंदिया – लोकार्पण समाजसेवी संस्था द्वारा संचालित सरस्वती इंग्लिश स्कूल तिरोडा मध्ये चिल्ड्रन्स फेस्टिव्हल आयोजन डाॅ.अनील पारधी यांच्या अध्यक्षतेखालील गुणवंत विद्यार्थ्याचे पालक विजय आर खोब्रागडे यांच्या हस्ते उद्घाटन व सत्कार करण्यात आले.

प्रमुख अतीथी वनिता खोब्रागडे स॔चालीका रत्ना पारधी मुख्याध्यापिका चेतना राणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्याची देवता सरस्वती मातेच्या प्रतीमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

शाळेतील माजी विद्यार्थी सौरभ खोब्रगडे व आकांक्षा खोब्रागडे याचा एम.बी.बी.एस ला प्रवेश मिळाल्याने .संस्थेच्या वतीने विजय खोब्रागडे व वनिता खोब्रागडे याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांच्या हस्ते चिल्ड्रन्स फेस्टिव्हल मध्ये प्रथम बक्षीस प्रिन्स बैस,द्वितीय बक्षीस किंजल चौवान हिला मिळाला, प्रथम बक्षीस कू ओजल येलेकर, द्वितीय बक्षीस कृष्णा सिसोदिया, मध्ये कू हर्षा पाटील, द्वितीय बक्षीस अनिता पटेल तर मध्ये प्रथम बक्षीस गोविल अंबुले तर द्वितीय बक्षीस रौनक बिसेन यांना मिळाला.
मुलांना प्रथम द्वितीय बक्षीस देण्यात आले.तसेच सत्कारानिमित्त यांनी आपल्या भाषणातून मुलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमलेश्र्वरी परिहार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन  फेमिता बंसोड यांनी केले.
विमलेश्वरी परिहार , प्रीती लुटे , फेमिता बंसोड , प्रेरणा मेश्राम , चेतना टेंभेकर , शारदा येळेकर , रागिणी बघेले , वैशाली शिंदे , बबिता पारधी , ममता रेवतकर , शीतल सेलोकर  या सहशिक्षिकांनी सहभाग दर्शविला.

*अमरदिप बडगे*
*गोंदिया प्रतिनिधी*

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ग्राम कवलेवाडा येथे 40 लक्ष रुपयाच्या विविध कामांचे भूमिपूजन

Tue Jun 21 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया –  गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी काल 20 जून 2022 रोजी यांनी ग्राम कवलेवाडा येथे 40 लक्ष रुपयाच्या विविध कामांचे भूमिपूजन केले यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र चौधरी, तानेश्वर रहांगडाले सरपंच कवलेवाडा जितेश बोदेले ग्रा.प.सदस्य,सिमाबई बिसेन, इंदुबाई पारधी, सुशीलाबाई पारधी,निर्मला कटरे ताई, दिलीप भैरम,एस.जे.पटले ग्रामसेवकछबीलाल पारधी परिचर सेवकराम भैरम, झनकलाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!