नागपुर – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत येणा-या प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र ( आरसीओएफ ), गोंडखैरी, नागपूरतर्फे सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादन प्रमाणीकरण या विषयावर एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिव्हिल लाइन्स, नागपूर येथील विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ. ए.स.राजपूत प्रादेशिक संचालक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. ए.एस.राजपूत यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय उत्पादकांसाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी आठवडी बाजार आयोजित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी गोशाळांचे बळकटीकरण आणि सुव्यवस्थितीकरण करण्याची सूचना केली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्यांनी जैवइंधन उत्पादन युनिट्सची स्थापना करण्याचा विचार पुढे नेण्यासाठी जानेवारी, 2022 च्या शेवटच्या आठवड्यात गोशाळा मालकांसह , प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र नागपूर येथे परिषद घेण्याचे ठरविले आहे.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com