२८ लाख २५ हजाराची तडजोड करून प्रकरणांचा केला निपटारा.
रामटेक :- रामटेक तालुका विधी सेवा समिती व बार संघ रामटेक यांच्या वतीने , दिवाणी न्यायालय रामटेक येथे राष्ट्रीय अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी व फौजदारी (१३८) एन.आय. ॲक्ट. ,बँक पतसंस्थांचे दाखल पूर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीचे घर व पाणी करांची प्रकरणे ठेवण्यात आली. त्या पैकी ३ दिवाणी व ७ फौजदारी प्रकरणे ४५ दाखल पूर्व प्रकरणे तसेच ८ पाणी व घर कराची प्रकरणे असे एकूण ६३ प्रकरणांतून एकूण रुपये २८,२५.५७३/- तडजोड करून निपटारा करण्यात आला. 

या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन २ रे सह दिवाणी न्यायाधिश के स्तर कामठी, जिल्हा नागपुर ए.ए कुलकर्णी यांनी केले.
रामटेक तालुका विधी सेवासमिती अध्यक्ष व दिवाणी न्यायाधीश व्ही. पी. धुर्वे, तसेच दिवाणी न्यायाधिश ए. ए. कुलकर्णी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे अध्यक्ष एम. एन. नेवरे, सचिव एम. व्ही. येरपुडे, पॅनेल वर एच. जी हटवार, सुरभी एस. खंडेलवाल, एस. डब्ल्यु. वाहणे, मयुर गुप्ता तसेच तालुका वकील संघाचे जयश्री मेंघरे व इतर सदस्य होते.
कार्यक्रमात
एस.बी.आय बँक मॅनेजर मोहन सिंह भाटी , युको बँक , बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ वडोदा चे मॅनेजर, बँकेतील सर्व कर्मचारी , ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक
उपस्थित होते.
ए. ए. कुळकर्णी, २ रे सह दिवाणी न्यायाधिश के स्तर कामठी, जिल्हा नागपुर यांनी लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन आपल्या भाषणात केले… न्यायाधीश व्ही.पी धुर्वे यांनी आपल्या भाषणात रामटेक तालुक्यातील लोकांनी दिवाणी दावे,बँक किंवा पतसंस्थेतील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने लोकांनी पुढे यावे व सामंजस्याने आपसातील मतभेद दूर करून आलेल्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणाचा आपसी समझौत्याने निपटारा करावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाची प्रस्तावना व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका वकील संघ चे अधिवक्ता ए. व्ही. गजभिये, रामटेक यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे व न्यायालयाचे कर्मचारी सहा अधिक्षक व्ही. बी. देविकर, लघुलेखक ए .एन .यादव, वरिष्ठ लिपीक धांडे, के एम वानखेडे, डी. बी. पाकडे, एम. एन. घोडमारे ,कनिष्ठ लिपीक साखळे, आकाश येरपुडे, पंकज कामडी, बेलिफ एस. जी. गावंडे आणि एस. एस. साकुरे, तसेच शिपाई सुरपाम, गोखले, धुळे व सफाईगार कटारे यांनी सहकार्य केले…