पुणे -बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधीत चाळकऱ्यांना पडताळणी करून मोबदला देणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधीत चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी करून घराचा मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली.

            विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील दोन हजार चाळी पुणे-बडोदा महामार्गात बाधीत होत असून चाळकऱ्यांनी आपली घरे प्रकल्पासाठी देण्यास सहमती दिली आहे प्रकल्पबाधीत चाळकऱ्यांना मिळणारा मोबदला जागामालक हिरावून घेत आहेत याबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

             महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेपुणे-बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण यांच्याकडे मुल्यांकन प्राप्त झालेले आहे.या बांधकामाचा मोबदला देण्यापूर्वी संबंधित जागामालकबांधकाम करणारे बांधकाम विकासक आणि चाळीतील घर विकत घेणारे यांचे ना हरकत दाखले व हमीपत्र घेवून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच चाळधारकांना पडताळणी करून घराचा मोबदला देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख

Sat Dec 25 , 2021
    मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, सवलतीच्या दरात कर्ज तसेच आपत्तीच्या कालावधीतही शासन मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना केली.                         विधानपरिषदेत राज्यातील मत्स्यव्यवसायाला मत्स्यशेतीचा दर्जा देणे, मत्स्यव्यवसायिकांना सवलतीच्या दरात कर्ज  व इतर सुविधा देणे याबाबतीत तारांकित प्रश्न विधानपरिषद सदस्य निलई नाईक यांनी उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत राज्यमंत्री दतात्रय भरणे, विधानपरिषद सदस्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com