सार्वजनिक रस्त्यावर कचरा फेकल्याप्रकरणी 5000 दंड घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन

चंद्रपूर : सार्वजनिक रस्त्यावर घनकचरा फेकल्या प्रकरणी व घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई महेश भवन येथे मारुती कॅटर्स यांच्या विरोधात करण्यात आली. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, अशी तंबीही महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने दिली आहे.

शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यात येऊ नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याउपरही उघड्यावर कचरा टाकला जातो. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार शहरातील मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणाऱ्या आस्थापनांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, महेश भवन येथील मारोती कॅटर्सच्या व्यवस्थापकाने सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

दिव्यांगाच्या समस्या व उपचाराबाबत प्राधान्याने मार्ग काढू – विमला आर.

Sat Dec 4 , 2021
 जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात नागपूर :  दिव्यांग हा सामाजातील दूर्लक्षित घटक असल्यामुळे नागरिकांनी त्याच्या सर्वागिण विकासाकरीता मदतीचा हात देणे, अत्यंत गरजेचे आहे.  दिव्यांगांना व्यंग असले तरी त्यांच्या अंगी असलेल्या प्रतिभाशाली व्यक्तीत्वामुळे ते  अनेक बाबतीत इतरांच्या पुढे आहेत. त्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी  चर्चा सत्र व कार्यशाळेच्या माध्यमातून प्रचलित व्यवस्थेत सामावून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com