वेश्या व्यवसायातील महिलांच्या पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी आधार व समन्वय आवश्यक – न्यायमूर्ती उदय ललित

मुंबई  : वेश्या व्यवसायातील महिलांच्या‍ पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी व त्यांचे वेश्या व्यवसायातील प्रवेश रोखण्याकरिता समाजातील सर्व घटकांकडून त्यांना आधार व मार्गदर्शन करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती तसेच राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष उदय ललित यांनी केले.

            सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती तसेच राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष उदय ललितमहाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मा. न्‍यायमूर्ती श्री.ए.ए. सईदउच्‍च न्‍यायालय विधी सेवा समितीचे अध्‍यक्ष तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मा. न्‍यायमूर्ती श्री.एस.एस. शिंदेश्रीमती अमिता ललीत यांनी मुंबई जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हितेंद्र वाणी यांच्यासह अलीकडेच मुंबईमधील खेतवाडी परिसरातील प्रेरणा संस्‍थेला भेट दिली, त्याप्रसंगी मा.न्‍यायमूर्ती श्री. ललित बोलत होते.

            मुंबईच्‍या देह व्‍यापार चालत असलेल्‍या विभागात प्रेरणा संस्‍थेतर्फे केल्‍या जाणाऱ्या कामकाजाबाबत संस्‍थेच्‍या प्रि‍ती पाटकर यांनी माहिती दिली.

            याप्रसंगी सर्व सन्‍माननीय न्‍यायमूर्ती यांनी प्रेरणा संस्‍थेच्‍या रात्र काळजी केंद्रात शिकणाऱ्या मुलांशी तसेच देह व्‍यापाराशी संबंधित काही पीडित महिलांशीही चर्चा केली व त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. तसेच त्‍यांनी तेथील मुलांद्वारे राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमांचीही माहिती घेतली. सन्‍मानपूर्वक जीवनाकरिता शिक्षण हेच महत्‍वाचे असल्‍याचे याप्रसंगी प्रेरणा संस्‍थेच्‍या आधाराने आपले शिक्षण यशस्‍वीरित्‍या पूर्ण करणाऱ्या मुलांनी नमूद केले.

            हेतू ट्रस्‍टचे सचिव रिखब जैन यांनी याप्रसंगी सदर संस्‍थेला व्‍हीडिओ प्रोजेक्‍टर भेट दिला. तुरूंग सुधारणेबाबत कार्य करणाऱ्या  बिना चिंथलपूरी व आशियाना फाउंडेशनच्‍या साचि मणियार या सुद्धा याप्रसंगी हजर होत्‍या.

        

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रलंबित योजनांच्या अंमल बजावणी साठी आ बावनकुळेना निवेदन

Tue Mar 29 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी प्रतिनिधी २९ मार्च- भारतीय जनता पार्टी कामठी शहरच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री, विधानपरिषद सदस्य आ चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सोपवून कामठी शहरातील प्रधानमंत्री आवास योजना, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजना आदी योजनातील दिरंगाई बद्दल तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक लावण्याची मागणी केली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाजप पदाधिकारी लालसिंग यादव,उज्वल रायबोले,विक्की बोंबले, जितेंद्र खोब्रागडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com