संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30 :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांना बिहार मधील गया येथे बालरक्षक प्रतिष्ठानचा
‘राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२२’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन बालरक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज चींचोरे, श्री नरेश वाघ व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हरिदास शर्मा बिहार द्वारा आयोजित केले जात आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बिहार आय आ टी चे संचालक डॉ त्रिलोकनाथ,सिंह व रमेश कुमार सिंह,व विशिष्ठ अतिथी म्हणून आभा राणी उपस्थित राहणार आहेत.