प्रियदर्शनी च्या शिक्षक-विद्यार्थ्यांची लता दिदीला गीतातून आदरांजली!

नागपूर(प्र) –  लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेच्या सोनेगाव स्थित प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी गाण कोकिळा भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांच्या दुःखद निधना निमित्य त्यांना एका आकस्मिक कार्यक्रमात  गीतातून आदरांजली अर्पित केली.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.साधना माकडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या आदरांजली कार्यक्रमात महाविद्यालचे जेष्ठ प्रा. सुभाष खाकसे व प्रा.अंजली गभने-दुधे यांनी लता दीदी च्या छायाचित्राला पुष्प अर्पण केले.तदनंतर लतादीदीच्या निधनाने संगीत क्षेत्र व देशाची न भरून निघणारी हानी झाल्याचे मनोगत व्यक्त केले.त्यांचे संगीतातील अनमोल स्थान व कार्य लक्षात घेता उपस्थित निवडक विद्यार्थी व प्रा. अंजली गभने यांनी लतादीदी नी गायलेले काही निवडक गीते  प्रस्तुत करून व शेवटी मौन धारण करून आदरांजली अर्पित केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत

Mon Feb 7 , 2022
वाडी न.प.तर्फे स्पर्धकांना बक्षिस वितरण ; उत्कृष्ट उपक्रमशील विध्यार्थ्यांचा गौरव ! वाडी (प्र) : नगर परिषद वाडी तर्फे स्वच्छ भारत अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण–२०२२ अंतर्गत पोष्टर चित्रकला स्पर्धा,भिंतीचित्र स्पर्धा,जिंगल स्पर्धा,लघुचित्रफीत स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून वाडी शहरातील शाळा-महाविद्यालय, हॉस्पिटल,हॉटेल,निवासी संकुल,मार्केट असोसीएशन,शासकीय कार्यालय यांचे स्वच्छतेबाबत मूल्यांकन करून गुणानुक्रम ठरविण्यात आला होता.तसेच स्वच्छ इंनोव्हेशन टेकनोलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com