भंडारा : आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी नोंदणी www.mygov.in वेबसाइट वर सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. ‘परीक्षा पे चर्चा 2022’ चे पाचवे सत्र तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार आहे.
शिक्षण मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवर ‘परीक्षा पे चर्चा 2022’ ची तारीख आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. ही चर्चा 1 एप्रिल 2022 रोजी तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि परीक्षेच्या तणावावर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करतील.
अधिक गुण मिळविण्याची स्पर्धा, कुटुंबातील सदस्यांची अपेक्षा, स्पर्धेचे वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि तणाव निर्माण होतो. जसजशी परीक्षा जवळ येऊ लागतात तसतसा त्यांचा हा तणाव आणि भीती वाढत जाते. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 01 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता परीक्षेच्या चर्चेच्या कार्यक्रमाला संबोधित करतील जेणेकरून विद्यार्थ्यांना अशा कठीण परिस्थितीत भीतीमुक्त, तणावमुक्त आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवता येईल.
जवाहर नवोदय विद्यालय, भंडारा चे प्राचार्य सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व जनतेला विनंती करतात की, आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हा कार्यक्रम बघून लाभ घ्यावा. तुमच्या मुलांसाठी भयमुक्त, तणावमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करून त्यांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनवा आणि त्यांच्या उज्वल भविष्यात तुमचा सोनेरी आधार द्या. असे आवाहन प्राचार्य पी. आर. कोसे ज. न. वि. यांनी केले आहे.