संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १२ किमी अंतरावरील नांदगाव जवळील पेंच नदी पात्रात प्रविण ईवनाते आघोंळ करताना पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्चा तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतक प्रविण रामभाऊ ईवनाते वय ४५ वर्ष राह. रिदोरा घोगदा ता. सौंसर जि. छींदवाडा, मध्यप्रदेश व मृतकाचे आई वडील भांडे रिपे यरिंग कामाकरिता दोन दिवस अगोदर पासुन नांदगाव येथे आले होते. सोमवार (दि.१३) जुन ला सकाळी ५ वाजता दरम्यान मृतक प्रविण रामभाऊ ईवनाते हा आंघोळ करायला पेंच नदी च्या पात्रात जातो म्हणुन गेला. परंतु परत न आल्याने वडील रामभाऊ मोबा ईवनाते वय ६५ वर्ष राह. रिदोरा घोगदा, मध्यप्रदेश यांना नांदगाव च्या लोकांनी सांगितले की, तुम्हचा मुल गा पाण्यात बुडुन मरण पावला. अश्या फिर्यादी रामभा ऊ ईवनाते यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसां नी पोस्टे ला मर्ग क्र. १७/२०२२ कलम १७४ जाफौ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.