संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 28 :- कामठी -अजनी मार्गावर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोक्षधाम कमिटी च्या साडे तेरा एकर जागेतील तीन एकर जागेत तीन करोड रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अद्यावत सर्वसुवीधा युक्त असलेल्या कामठी आजनी मार्गावरील नवनिर्मित मोक्षधामात श्री शिव भगवान शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी श्री गंज के बालाजी मंदिरातून सजवलेल्या रथावर भगवान शंकराच्या मूर्तीची तेजराजजी जैन महाराज यांचे हस्ते पूजा आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.ही शोभायात्रा जयस्तंभ चौक, शारदा चौक, गोयल टाकीज चौक ,गांधी चौक, पोरवाल चौक, सत्यनारायण चौक ,फुल ओली चौक, सोनार ओळीं, बोरकर चौक, मेन रोड, नेताजी चौक ,चावडी चौक , दाल ओळीं, मच्छी पुल, राम मंदिर रोड नगर भ्रमण करीत नवीन मोक्षधाम येथे शोभायात्रेचे समापन करण्यात आले. शोभायात्रेचे विवीध सामाजिक संस्था व नागरिकांनी ठीक ठिकाणी जंगी स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले शोभायात्रेत आमदार टेकचंद सावरकर ,प्रदेश भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी संकेत बावनकुळे , प्रदेश भाजप व्यापारी आघाडीचे पदाधिकारी व कामठीचे उद्योगपती अजय अग्रवाल ,मोक्षधाम समितीचे अध्यक्ष हरिशंकर गुप्ता, कार्याध्यक्ष संदीप कश्यप, सचिव विनोद संगेवार, उपसचिव चंद्रकांत सीरिया ,कोषाध्यक्ष रवी गोयल ,गोपाल शर्मा ,राजेश खंडेलवाल, मनीष मेहाडिया नगरसेवक संजय कनोजिया ,उज्वल रायबोले, राजू पोलकमवार,कपिल गायधने, राजेश दुबे ,गोपाल शर्मा ,अशोक गुप्ता ,लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, गोपाल सीरिया, कमल यादव ,संजय खोब्रागडे, विजय कोंडुलवार,राजा यादव, प्रमोद वर्णम, हर्षद खडसे, राजू बावनकुळे,डॉ राजेंद्र अग्रवाल, डॉ मंगतानी, एडवोकेट गोपाल शर्मा , सविता कुलरकर संध्या रायबोले ,सुषमा सिलाम, पिंकी वैद्य सह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते महाप्रसादाने प्राणप्रतिष्ठा समारोहाची सांगता करण्यात आली.