संदीप कांबळे,कामठी
-शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान ‘अनुदानाची प्रतीक्षा
कामठी ता प्र 28:-पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजाराचे अनुदान दिले जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.मात्र मागील काही महिण्यासपासून या योजनेवर कार्यरत राहण्यासाठी राज्यस्तरावर महसुल प्रशासनाने बहिष्कार दर्शविला आहे.यानुसार कामठी तहसील महसूल प्रशासनाने सुद्धा याला पाठींबा देत बहिष्कार घातला आहे तर हे काम आधीच कृषी विभागाकडून महसूल प्रशासनाकडे हलविल्याने आता ही योजना राबविण्यासाठी प्रशासनाचाच वेळकाढूपणा बहिष्कार आहे त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत असून लाभापासून वंचित राहावे लागल्याने मागील काही महिन्यांपासून ‘पंतप्रधान किसान सन्मान योजना’हवेतच विरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नवीन शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत.शिवाय काहींची नावनोंदणी करूनही त्यांना अद्याप पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही.शेती खरेदी केलेले शेतकरी, मयत असलेल्या शेतकऱ्यांचे वारसदार, विधवा महिला, काही कारणास्तव ज्यांना नोंदणी करता आला आली नाही अशा शेतकऱ्यांना लाभ केव्हा मिळणार?असा प्रश्न येथील लाभार्थीकडून व्यक्त केल्या जात आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर ओनलाईन नोंदणी केलो जात असल्याचे सांगितले आहे.मात्र कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याबाबत माहितीचा अभाव असल्याने त्यांना नोंदणी करता येत नसल्याचे वास्तव आहे.तसेच आपले सेवा केंद्रावर नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.शेतकरी तहसील कार्यालय, कृषी विभागाकडे येऊन चकरा मारत आहेत मात्र तेथेही मार्ग निघत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.तहसील कार्यालय स्तरावर ही याबाबत काहीच उपाययोजना होत नसल्याने सदर योजना हवेतच विरली आहे.