संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 6:-स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे महाविद्यालयाच्या ग्रंथालय कक्षात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची सोशियल इंजिनियरिंग’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत इतिहास विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ जितेंद्र सावजी तागडे यांनीविशेष व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना या नव्या विषयाची जाणीव करून त्याची जिज्ञासा शंमविण्याचा उद्देश स्पष्ट केला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे , वक्ते व सत्कारमूर्ती डॉ सतीश चाफले, सहाय्यक प्राध्यापक व इतिहास विभागप्रमुख आर एस मुंडले महाविद्यालय नागपूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोशियल इंजिनियरिंग च्या नावीन्यपूर्ण माध्यमातून विशिष्ट व्यक्तीची पारख करून त्यांच्या साहाय्याने अखंड स्वराज्य निर्माण करण्याचे तंत्र मार्मिक उदाहरणांसह समजावून सांगितले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विनय चव्हाण यांनी माहिती व तंत्रज्ञानाचा सामाजिक अभियांत्रिकीशी तुलनात्मक संबंध यावर मार्गदर्शन केले.यावेळी उपप्राचार्य डॉ रेणू तिवारी, डॉ सिद्धार्थ मेश्राम, डॉ दीपक भवसागर, डॉ किशोर ढोले, डॉ महेश जोगी, डॉ खांडेकर, प्रवीण अंबादे , रजत गजभिये व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बो बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आय क्यू ए सी समनव्यक प्रशांत धोंगळे, डॉ तुषार चौधरी, व इतिहास मंडळाने परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे संचालन डॉ आशिष थुल यांनी केले तर आभार सिडीसी सदस्य व इतिहास मंडळाचे सल्लागार डॉ जयंत रामटेके यांनी मानले.
पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभाग द्वारा ‘छत्रपती शिवाजी महाराजांची सोशियल इंजिनियरिंग’विषयावर व्याख्यान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com