पोलीस मुख्यालयातील लसीकरण केंद्रावर 552 लाभार्थ्यांना बुस्टर डोस

भंडारा : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. आज पोलीस मुख्यालय भंडारा येथे पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अति. पो. अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात ड्रिल शेड येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता बुस्टर डोस चे आयोजन केले होते.

या बुस्टर डोस कॅम्प मधे पोलीस, होमगार्ड, जिल्हाधिकारी कार्यालय स्टाफ, जेष्ठ नागरिक असे एकूण 535 जणांना बुस्टर डोस देण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधक उपाय म्हणून कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात  494  पोलीस अधिकारी / अंमलदार, 42 जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक व 16 सैनिक ह्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अग्नी सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण व रंगीत तालीम

Wed Jan 12 , 2022
भंडारा – आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांमध्ये कसा बचाव करावा. याबाबत आज प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा (लाखनी), लाखांदूर, साकोली, पवनी येथे अग्नी सुरक्षासंदर्भात प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी तहसीलदार लाखांदूर अखिलभारत मेश्राम, पवनी तहसीलदार निलिमा रंगारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!