उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बांधले हाती घड्याळ…
मुंबई दि. १७ फेब्रुवारी – पिंपरी-चिंचवडचे भाजपचे विद्यमान नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी पिंपरीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, सौ. कविता अल्हाट, शिक्षण समितीचे माजी सभापती विजय लोखंडे, नगरसेवक मयुर कलाटे, प्रदीप आहेर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.