‘पीसीपीएनडीटी’ अंतर्गत प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

 मुंबई  : पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात दोषसिध्दीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावीअशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

 सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पीसीपीएनडीटी कायद्याबाबतची राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीत श्री टोपे यांनी या सूचना दिल्या.

लिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्हयांमध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जनजागृतीसाठीची मोहीम राबविण्यात यावीअशा सूचनाही श्री. टोपे यांनी दिल्या.

 पीसीपीएनडीटी आणि एसटीपी कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबवावी. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि कायद्याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने जनजागृती करावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

  यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासआरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटीलसदस्य डॉ. नंदीता पालशेतकरनिशीगंधा देऊळकरडॉ. मनीषा कायदेडॉ. अजय जाधवराजकुमार सचदेवडॉ. आशा मिरगेनीरज धोटेवैशाली मोते आदी सदस्यांनी आपली मते व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मुंबईतील विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

Thu Feb 3 , 2022
  मुंबई : मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.             वरळी-शिवडी जोडरस्ता, नरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, कलानगर जंक्शन आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!