संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1:- नागरिकांत दैनंदिन होणारी मुख रोगाची वाढ लक्षात घेता या मुख रोगावर उपचार करण्यासाठी न्यू स्माईल डेंटल क्लिनिक आणि इको लॉजिक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने इस्माईलपुरा कामठी येथे आयोजित मोफत दंत तपासणी शिबिर तसेच मोफत औषधी वितरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात 150 च्या वर नागरीकानी उपचार घेतला.
या शिबिरात न्यू स्माईल डेंटल क्लिनिकचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ युसूफ एम मोमीन आणि डॉ आयशा सुलताना यासह आरोग्य चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबिराचे आयोजक इको लॉजिक फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ अभिषेक चिमनकर, सचिव डॉ शैलेश बहादूरे तसेच हाजी अहफाज अहमद, इमरान अहमद, नियाज अहमद, अमर वाघमारे, उमेश गोडबोले, अंकिता पाटील, शहबाज अख्तर, नकीब टेलर, शोएब आलंम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
150 च्या वर नागरिकांनी घेतला मोफत दंत तपासणी शिबिराचा लाभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com