ऑरेंज सिटी मॉल बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी
ऑरेंज सिटी स्ट्रिट अंतर्गत प्रकल्प
नागपूर, ता. २४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्पांतर्गत भूखंड क्रमांक १ वरील ऑरेंज सिटी मॉलचे प्लिंथ लेव्हलवरील उर्वरित बांधकाम नागपूर महानगरपालिकेद्वारे खासगी उद्योजकांमार्फत भागीदार तत्वावर विकसीत करण्यात येत आहे. या कामाचे शुक्रवारी (ता.२५) भुखंड क्रमांक १, जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन जवळ सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.
भूमिपूजन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. महापौर दयाशंकर तिवारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवितील.
कार्यक्रमाला विशेषत्वाने खासदार डॉ.विकास महात्मे आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, रा.काँ. पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेने गटनेता किशोर कुमेरिया, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, नगरसेविका मिनाक्षी तेलगोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते यांची उपस्थिती असेल.
भूमिपूजन समारंभाला नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी केले आहे.