नागपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा लोक गीत व लोक नृत्य विभाग स्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत हे आयोजन करण्यात आले आहे. 4 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या आयोजनामध्ये नागपूर विभागातून लोक नृत्य गटात मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील चमू प्रथम आली. लोकगीत गटामध्ये लोकरंग कला शुंगार गृह तालुका सावनेर जिल्हा नागपूर प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम आलेल्या या चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
तत्पूर्वी आज क्रीडा विभागाचे नागपूर उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाचे परीक्षण डॉ.रवी हरिदास, भुपेश मेहेर, सचिन दाभनेकर होते. परीक्षकांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले.
विभागांमध्ये लोक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक अनुप डान्स ग्रुप सिमुलतला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांना मिळाला. तृतीय पुरस्कार नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डब्बा, सडक अर्जुनी,जि. गोंदीया यांना मिळाला. लोकगीत स्पर्धत ब्रह्मानंद संस्कृतिक विद्यालय गोंदिया यांना पुरस्कार मिळाला.