संदीप कांबळे, कामठी प
-शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक-मुख्याधिकारी संदीप बोरकर
-पूर्व नियोजन करण्याची गरज
-नाले सफाई करण्यासाठी नाल्यावरील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणा–सी ओ संदीप बोरकर
कामठी ता प्र 6:- पावसाळा तोंडावर येणार असून पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पावसळयापूर्वी शहरातील नाले साफ सफाई करून शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक असल्याने मान्सूनपूर्व कामे करून पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे यासाठी कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी एक पाऊल पुढे करीत दयनीय अवस्था झालेल्या नाले सफाईवर जोर दिला आहे.
कामठी शहराला लागून असलेला बागडोर नाला व शहरातील नाल्याचे गाळ काढणे, तसेच सफाई च्या कामाला गती देण्यात आली आहे.
कामठी शहरातील मोठमोठ्या नाल्याची दयनीय अवस्था झाली असून त्या मोठ्या नालयामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला असल्याने त्याची आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील लहान मोठे नाले स्वछता करण्याची गरज आहे. ज्यामुळे शहरात पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवल्या जाते पावसाळ्याच्या दिवसात स्वछतेच्या अभावी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते आणि त्यामुळे शहराची स्वचछताची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक आहे जेणेकरून पावसाळ्यात दिवसात रोगराईच्या समस्येला शहरवासीयांना तोंड द्यावे लागणार नाही .यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून समाधानकारक व अपेक्षित उपाययोजना सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तसेच नाला सफाई करण्यासाठी शहरातील नाल्यावर बांधण्यात आलेले अतिक्रमण लकरात लवकर काढण्यात येईल असा ईशारा सुद्धा मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिला आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने सदर नालेसफाई चे कंत्राट मोठा निम कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला देण्यात आले असून सदर कंत्रातदारा मार्फत सुरू करण्यात आलल्या नाला सफाई च्या कामाची पाहणी आज मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले.याप्रसंगी जल व मल स्वचछता अभियंता वीरेंद्र ढोके, स्वचछता निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां आदी उपस्थित होते.