आदरणीय पवारसाहेब वाढदिवशी ‘व्हर्च्युअल रॅली’ च्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार – जयंत पाटील

१४ ते २० डिसेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान सप्ताहा’ चे आयोजन.

कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम..

विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निवल’ असा आगामी काळाकरीता कार्यक्रम.

मुंबई  – आदरणीय शरद पवारसाहेबांना यावर्षी ८१ वर्ष पूर्ण होत असून कोरोनामुळे यावर्षी आदरणीय पवारसाहेब व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत अशी माहिती देतानाच भेटण्यासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे.

वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अ‍ॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निवल’ असा आगामी काळाकरीता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

१४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बौद्ध अध्ययन व पाली विभागात कुलगुरूंची ढवळाढवळ : विद्यार्थ्यांचा आरोप 

Sat Dec 11 , 2021
नागपूर -नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांची अनावश्यक ढवळाढवळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन अनावश्यक ढवळाढवळ करु नये अशी विनंती केली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बुद्धीस्ट स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने  दिला. पाली पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून प्रा. डॉ. नीरज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com