नागपुर :- नागपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी ओबीसी विभाग, तफें नवनियुक्त शहर ”कार्यकारीणी घोषणा व पदाधिकारी परिचय” कार्यक्रम राष्ट्रपीता महात्मा गांधी ह्यांचे पुण्यतीथी पर्वावर रविवार दि. 30 जानेवारी 2022 रोज सकाळी 10.30 वा. देवाडीया भवन चिटणिसपार्क महाल येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड अभिजीत वंजारी व नागपुर जिल्हा ओबीसी विभाग प्रभारी इंजी. प्रकाश जाणकर (यवतमाळ) व विदर्भ विभागीय अध्यक्ष गोविंद भेंडारकर (चंद्रपुर) व सहप्रभारी रवि भुसारी, प्रदेश पदाधिकारी संजय भिलकर, अशोक यावले चंद्रकांत हिन्गे, मा.विजयाताई धोटे, सुरेंन्द जयस्वाल, विजय वणवे, सह मा.अवंतिका लेकुरवाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक राजेश कुंभलकर शहराध्यक्ष यांनी केले तर आमदार विकास ठाकरे यानी नव नियुक्त कार्यकारिणीची घोषना व ओबीसी आघाडीच्या कार्यासंदर्भात विस्तृत्व मार्गदर्शन करुन ओबिसिच्या हक्क व अधिकारारिता कॉंग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत लढेल असे ठणकावून सांगितले व नवनियुक्त पदाधिकार्यना पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्यात, यावेळी ॲड.आमदार अभिजीत वंजारी, प्रकाश जानकर, गोविंद भेंडारकर समवेत प्रदेश पदाधिकारिंनी विचार व्यक्त केलीत. शहराध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी नागपुर शहर कॉंग्रेस ओबीसी आघाडी कार्यकारीणीमध्ये १५ शहर उपाध्यक्ष, १३ सरचिटणीस, १८ सचिव, २४ संघटक, ९ कार्यकारीणी सदस्य, शहर कार्याध्यक्षपदी मिलिंद येवले, प्रवक्तापदी ॲड. रजणिश पोतदार, कार्यालय प्रमुख व सरचिटणीस मोरेश्वर भादे, कोषाध्यक्ष सचिन पारधी, तर प्रसिद्धी प्रमुख ॲड भुपेश चव्हाण विभागीय अध्यक्ष म्हणून पुर्व नागपूर विभाग गुणवंत झाडे, पश्चिम नागपूर -विश्वनाथ देशमुख, उत्तर नागपूर -चेतन तराळे, दक्षिण नागपूर – माधवराव गावंडे, व कार्याध्यक्ष राजु मोहोड, दक्षिण पश्चिम नागपूर- कुमार बोरकुटे, मध्य नागपुर प्रकाश लायसे व कार्याध्यक्ष मोंटी मोरकुटे इत्यादींचे नावे जाहिर केली. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद येवले यांनी तर आभारप्रदर्शन मोरेश्वर भादे महासचिव ह्यानी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात झाली.