चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानांअंतर्गत दुर्गापूर रोड तुकूम येथे येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय परिसरात “माझा कचरा; माझी जबाबदारी” कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पर्यावरण विषयक जनजागृती व श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महाविद्यालयाच्या परिसरात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. घरातील खरकटे व शीळे अन्न, मृत जनावरे व प्लास्टिक कचरा येथे नागरिकांकडून टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात पहाटेच्या वेळी नागरिक व्यायाम व शुद्ध हवा घेण्याकरिता येतात. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती व श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनपाच्या स्वच्छता विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल शेळके, रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन अध्यक्ष राहुल कोटकर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश लेनगुरे यांनी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण सप्ताहाबद्दल व स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. मुख्य स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार यांनी स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा या मोहिमेबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी डॅनिश पठाण, सुहास थोरात, आकाश नागपुरे, बंटी बिर्या, पूजा भुसारी, पुनम भुसारी, रक्षण धरणीमातेचे फाउंडेशनतर्फे अविनाश लेनगुरे, राजीव शेंडे, सुरज हजारे, हरप्रीत सिंग, माधुरी शेंडे, रश्मी कोटकर, शाम गोहणे, आशिष भरडकर, मृणाल वडगावकर, गौरव वरारकर, मयुर उरीते, नागेश उमाले, विशाल पेंदोर, मृणालीनी नळे, सोनाली दुबे, आरुष लेंनगुरे व योगिनी बोरीकर उपस्थित होते.