संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 21:-शहरात कामठी नगर परिषद च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला.परंतु प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा रद्द झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर 5 वर्षानंतर एक्शन मोड मध्ये आलेले हवसे नवसे इच्छुक उमेदवार थंडावले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रद्द झालेली प्रभाग रचना नेमकी कधी जाहीर होणार याकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागले असले तरी इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षा भंग झाल्याने निवडणुका लांबणीवर गेल्याचे गृहीत धरून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करणारे इच्छुक उमेदवार जनतेशी कमी संपर्क साधत असल्याचा प्रत्यय देत आहेत.सहा महिने तरी निवडणुका होणार नसल्याने शहरातील प्रभाग रचना पुन्हा नव्याने बनणार असल्याने तीन महिने आराम करून आता नंतर जनतेत मिसळण्याचा काम इच्छुक उमेदवाराकडून होणार असल्याचे दिसून येते.इच्छुक हवसे नवसे उमेदवारांनी निवडणुका तोंडावर असल्याचा आलेख समोर करीत प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणाकडे आपला मोर्चा वळविला होता मात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने भेटोगाटीच्या मोर्चालाही आता लगाम बसण्याची चिन्हे आहेत .जनताही मागील पाच वर्षांचा हिशोब विचारणार आहेत त्यामुळे अनेक पुढाऱ्यांची गोची सुद्धा होणार आहे.निवडणुका लांबणीबर आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तिकिटासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावण्याचे चित्र आहे.
निवडणुका लांबणीवर पडल्याने हवसे -नवसे इच्छुक उमेदवार पुन्हा थंडावले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com