सावनेर – 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी झालेल्या सावनेर व्यापारी संघाच्या बैठकीत सर्वसहमतीने नवी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद व्यापारी संघाचे निवृत्त अध्यक्ष विनोद जैन यांनी भूषवले, आणि सचिव मनोज बसवा यांनी आयोजन केले. बैठकीत नवी कार्यकारिणीच्या 14 सदस्यांची घोषणा करण्यात आली.
नवी कार्यकारिणीमध्ये अतुल पाटील अध्यक्षपदी, दिनेश दमाहे सचिवपदी, राहुल बारई उपाध्यक्षपदी, पवन जामदार कोषाध्यक्षपदी, दिपक भोंगाडे सहसचिवपदी, तर किशोर अंतुरकर सहकोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तसेच इतर सदस्यांमध्ये विजय पुण्यानी, संजय चंदवानी, प्रफुल्ल चंदनखेड़े, गिरीश बनाईत, विजय पांडे, लिलेश घटे, आशिष सोनभद्रे, जाहीद शेख, पियुष झुनझुनवडिया यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत तरुणांना प्राधान्य दिल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.