नागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी त्यांच्या पुतळे व प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. रविवारी (ता.२३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी मानस चौक येथील नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. मनपा मुख्यालयातही महापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय सतरंजीपुरा येथेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नगरीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांमध्ये महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, ज्वाला धोटे, यशवंत तेलंग, भूपेश चॅटर्जी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, दिलीप देवगडे, शुभम बावणे आदी उपस्थित होते.