भंडारा, दि. 16 : नेहरू युवा केंद्राव्दारे देशभक्ती व राष्ट्र निर्माण या विषयावर आधारित सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या विषयावरील जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा नुकतीच प्रगती कला महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र भंडाराच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजना, प्रगती महाविदयालयाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. गजानन कळंबे तर परिक्षक म्हणून डॉ. ज्योती नाकतोडे, प्रा. डॉ. शालिक राठोड व प्रा.मोरेश्वर राऊत होते. तर कार्यक्रमाला नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद वैद्य, रमेश अहिरकर, अतुल गेडाम, अभिजीत मेश्राम, कोयल मेश्राम, स्नेहल वैद्य उपस्थित होते.
भाषण शैलीमुळे विकास घडविण्यास मदत होते. तसेच सभाधीटपणा आणि व्यक्तीमत्व चतुरस्त्र होण्यास मदत होते, असे प्रतिपादन या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी केले. चांगल्या भाषणासाठी वाचन चिंतन व मनन ही करणे गरजेचे आहे. तर डॉ.गजानन कंळबे यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहून आपले अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन सहभागी स्पर्धकांना केले. तर जिल्हा युवा अधिकारी हितेंद वैद्य यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या कार्यक्रमाची व आयोजनामागची भुमीका मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भुमेश्वरी हुकरे पवनी, व्दितीय क्रमांक महेश मेश्राम लाखांदुर तर तृतीय क्रमांक कविता मेश्राम भंडारा यांनी पटकविले .