नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला बंगळुरू येथे आयोजित ‘हेल्दी स्ट्रीट्स कॅपेसिटी बिल्डिंग कार्यशाळेमध्ये सायकल फॉर चेंज आणि स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजेसमध्ये प्रशंसनीय कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले. नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक आणि सायकल फॉर चेंज (IC4C) आणि स्ट्रीट फॉर पीपल (S4P)च्या नोडल ऑफीसर डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या चमूची या कामगिरी बद्दल प्रशंसा केली आहे. डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी त्यांना या उपलब्धीची माहिती दिली. यावेळी स्मार्ट सिटीच्या मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, मोबिलिटी विभागाचे महाव्यस्थापक राजेश दुफारे, ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले, मनपाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, स्मार्ट सिटीचे डॉ. पराग अरमल, अनूप लाहोटी सुद्धा उपस्थित होते.
देशात पायी चालण्याला आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्ट्रीट डिझाईन प्रकल्पांच्या प्रगतीला गती देण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन, केंद्र शासनाचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) च्या भागीदारीत केंद्रीय नागरी भूपृष्ठ वाहतूक संचालनालय आणि बंगळुरू स्मार्ट सिटीतर्फे कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बिरथी बसवराज, मंत्री नगर विकास विभाग, कर्नाटक, मंजुळा व्ही, अतिरिक्त मुख्य सचिव, आयुक्त, नागरी संचालनालय, भू वाहतूक, कर्नाटक, राकेश सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव, शहरी विकास विभाग, कर्नाटक सरकार आणि बंगळुरू स्मार्ट सिटीचे अध्यक्ष राजेंद्र चोलन, व्यवस्थापकीय संचालक, बंगळुरू स्मार्ट सिटी आणि कुणाल कुमार, सहसचिव आणि मिशन संचालक, स्मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, राहुल कपूर, संचालक, स्मार्ट सिटीज मिशन आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार गृहनिर्माण मंत्रालयातील मान्यवर आणि आयटीडीपी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अस्वथी दिलीप या कार्यशाळेत उपस्थित होते.
‘ग्रीन मोबिलिटी आणि नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL) तर्फे 75 सायकल स्टॅन्ड प्रदान करण्याचा प्रस्ताव दिला आहे. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे सायकलचा उपयोग करणा-या विविध संस्थांसोबत सामाजिक-आर्थिक गट च्या आवश्यकता समजून घेण्यासाठी चर्चा सुरु करण्यात आली आहे, असे एनएसएससीडीसीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.
नागपूरच्या कामाबद्दल महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्मार्ट सिटी आणि संपूर्ण रस्त्याच्या डिझाइनची अंमलबजावणी करण्याच्या कृती आराखड्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शहरातील संपूर्ण रस्त्यावरील डिझाइन उपक्रमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हेलदी स्ट्रीट डिझाइन तत्वावर आँरेज सिटी स्ट्रीट विकसीत केल्या जात आहे. या आधारावर संपूर्ण स्ट्रीट डिझाइन तत्त्वे, ऑरेंज सिटी स्ट्रीट आता डिझाइन, विकसित आणि केले जात आहे, असेही ते म्हणाले.