-नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे प्रधानमंत्री आवास योजना (घटक क्र. ३) अंतर्गत ख.क्र. १२/१-२ मौजा वांजरी व ख. क्र. ६२ व ६३ मौजा तरोडी (खुर्द), येथील उर्वरीत २९८० घरकुलांची सोडत-२०२१ दिनांक १६.०८.२०२१ रोजी काढण्यात आली.
नागपूर – या सोडतीमध्ये २९८० लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी १५०८ लाभार्थ्यांनी दस्तावेजांची तपासणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे केलेली असून खसरा क्र. ६३ मौजा तरोडी (खुर्द) येथे ४२२ लाभार्थ्यांनी, खसरा क्र. ६२ मौजा तरोडी (खुर्द) येथे १२३, खसरा क्र. १२/१-२ मौजा वांजरी येथे ४६ असे एकूण ६३४ लाभार्थ्यांनी घरकुलांची रक्कम देय केलेली आहे. रक्कम देय केलेल्या लाभार्थ्यापैकी आता पर्यंत ४१४ लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटपत्र नामप्रविप्राव्दारे देण्यात आलेला आहे. उर्वरीत २२० लाभार्थ्यांना डिसेंबर २०२१ पर्यंत घरकुलाचे वाटपत्र देण्याचा नामप्रविप्राचा मानस आहे.
ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफीकेशन केलेले आहेत. तथापी मागणीपत्रक जमा केलेले नाहीत अशा ९२३ लाभार्थ्यांनी मागणीपत्रकाची रक्कम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये भुगतान वेळेवर किंवा विहीत मुदतीत केले नाही तर त्यांची सदनिका रद्द करून प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना नाईलाजास्तव वाटप करावे लागेल.
मा. महानगर आयुक्त, नामप्रविप्राव्दारे लाभार्थ्यांना संधी देण्यात येते की उर्वरीत ९२३ लाभार्थ्यांनी घरकुलांची रक्कम लवकरात लवकर देय करावी जेणे करून अश्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलांचा ताबा नामप्रविप्राव्दारे देण्यात येईल.
एकूण २९८० लाभार्थ्यांपैकी उर्वरीत १४७२ लाभार्थ्यांनी आजपावेतो दस्तावेजांची तपासणी केलेली नाही. अश्या लाभार्थ्यांना मा. महानगर आयुक्त, नामप्रविप्राव्दारे लाभार्थ्यांना संधी देण्यात येते की ज्या लाभार्थ्यांनी घरकुलांच्या पात्रतेकरीता अजून पर्यंत दस्तावेजाची तपासणी केलेली नाही. अश्या लाभार्थ्यांनी दिनांक ३१.१२.२०२१ पर्यंत दस्तावेजांची तपासणी करून घ्यावी अन्यथा लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले घरकुल रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.