नागपुर – सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच 22 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या “मराठी इंडियन आयडॉल कार्यक्रमात नागपूरच्या कैवल्य विनय केजकर ला त्याच्या उत्कृष्ट सादारीकरणामुळे महाराष्ट्रातील रसिकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आणि या कार्यक्रमाचे परीक्षक नामवंत संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी सुद्धा त्याचे खूप कौतुक केलेले आहेत. आणि खुप खुप शुभेच्छा दिल्या. कैवल्याची घरची परिस्थिती वडिलांच्या प्रकृतीमुळे ढासळलेली आहे. मागील ९ महिन्यांपासून त्याचे बाबा ऑक्सिजनवर आहेत. आई पोस्ट कोविडमुळे आजारी असते. आई बाबांची चिंता आणि घरच्या अनेक संकटांशी लढत “इंडीयन आयडॉल मराठी ” चे ऑडीशन राउंड पार करत, थिएटर राउंडला गोल्डन माईक मिळवून या हरहुन्नरी कलाकाराने इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वा मध्येच स्वतःच नाव ठाणं केलं. कैवल्य ने संगीत सांभाळून मागील वर्षात केमिकल इंजिनियरिंगची डिग्री हासिल केली असून संगीत क्षेत्रातले ही अनेक नामवंत पुरस्कार त्याला प्राप्त झाले आहेत. नागपूरच्या या कलावंताला सोनी लिव्ह अँप वरून येत्या 13 डिसेंबर पासून भरभरून वोटिंग करा आणि पहिला इंडियन आयडॉल होऊ द्या. नागपूरकरांनी त्याच्यासाठी बघा सोनी मराठीवर सोमवार/ मंगळवार रात्री 9 वाजता. मराठी इंडियन आयडॉल.
नागपूरकरांनी कैवल्य केजकर यांना आपले वोट नक्की करा आणि नागपूरच्या मुलाचं नाव रोशन करा हिच त्यांच्या आई-वडिलांची इच्छा आहे.