नागपूर – एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड व सह्याद्री संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील ज्या मुलांकडे घरी संगणक सराव करण्यासाठी सोय नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नागपूर शहरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना मनपा शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत करून मुख्य प्रवाहात ” विंग्स fly हाय ” या प्रकल्पाच्या अंतर्गत आणणार आहेत. गरीब, गरजू व होतकरू अशा वंचित मुलांना संगणक शिक्षण सुविधांसह सुसज्ज बस मध्ये पूर्ण प्रवेश मिळावा आणि शाळा सोडलेल्या मुलांना शाळेत परत जाण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यांत आलेला हा उपक्रम येत्या 2 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी 11:30 वाजता मकरधोकडा हिंदी उच्च प्राथमिक शाळा, काटोल रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष दुष्यंत पाठक हे उपस्थित राहतील. तसेच मुख्य अतिथी पाहुणे म्हणून राधाकृष्णन बी.आयुक्त नागपुर व श्रीनिवासन अय्यर व्यवस्थापकीय संचालक (एल्केम साऊथ एशिया लिमिटेड) प्रकाश वराडे सहाय्यक आयुक्त धरमपेठ झोन, डॉ.रंजना लाडे महानगरपालिका सचिव एनएमसी नागपुर, श्रीमती प्रीती मिस्त्रीकोटकर शिक्षण अधिकारी एनएमसी आणि श्री. विजय क्षीरसागर सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष यावेळी उपस्थित राहतील.
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण बस चे उद्घाटन सोहळा गुरुवारी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com