सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसंदर्भात ‘आयरास्ते’चे मनपा आयुक्तांपुढे सादरीकरण

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शहरातील ३७ ब्लॅक आणि २० ग्रे स्पॉटवर होणार कार्य

नागपूरता. २५ : नागपूर शहरातील सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसंदर्भात ‘आयरास्ते’ (Intelligent Solutions for Road Safety through Technology & Engineering) या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या प्रकल्प पदाधिका-यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्यापुढे सादरीकरण सादर केले.

आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या सादरीकरणावरील चर्चेदरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यासह मुख्य अभियंता प्रदीप खवसे, कार्यकारी अभियंता (वाहतुक) रविंद्र बुंधाडे, उपअभियंता  श्रीकांत देशपांडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अजय मानकर,  गिरीश वासनिक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी, आयरास्ते प्रकल्पातर्फे INAI चे सीईओ वर्मा कोनाला (Varma S. Konala), आयआयआयटी हैदराबादचे गोपीनाथ चापिडी (Gopinath Chappidi), इनाइ (INAI) चे प्रधान सचिव डॉ. अंबू मनी सुब्रमण्यन (Anbu Mani Subramanian), सीआरआयए चे मुख्य सचिव डॉ. वेलन्यूरन सेनापती (Velnuruyan Senapati), राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद परिवहन मंत्रालय भारत सरकारचे सदस्य राजू वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्तांसह सर्व अधिका-यांना नागपूर शहरातील ब्लॅक स्पॉट आणि ग्रे स्पॉटची माहिती देण्यात आली. ज्या भागावर सतत अपघात होतात, जिथे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे, जिथे अनेक अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे असे नागपूर शहरात मनपा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणारी ३७ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेली आहेत. यापैकी चिखली, पारडी हनुमान मंदिर चौक, प्रकाश हायस्कूल, म्हाळगी नगर या चार ठिकाणांवर तयार करण्यात आलेला सुरक्षा अहवालावर ‘आयरास्ते’द्वारे सादरीकरण करण्यात आले. शहरातील संपूर्ण ३७ ब्लॅक स्पॉटवर सुक्ष्मरित्या अहवाल तयार करून ते सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी ‘आयरास्ते’च्या अधिका-यांनी सांगितले.

याशिवाय ज्या रस्त्यांवर अपघाताची शक्यता आहे, जिथे अंमलबजावणी केल्यास अपघात टाळता येईल अशी संभाव्य अपघातप्रवण स्थळे अर्थात ग्रे स्पॉटची सुद्धा यावेळी माहिती देण्यात आली. नागपूर शहरात २० ग्रे स्पॉट निश्चित करण्यात आले. ब्लॅक स्पॉट आणि ग्रे स्पॉट सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाय योजना सुचविण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील अपघात कमी होउन सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

याशिवाय ‘आयरास्ते’द्वारे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांमध्ये उपकरणे लावून ते चालविणा-या वाहकांचा अभिप्राय नोंदविला. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने उपकरणाद्वारे वाहकांना आगाऊ सूचना दिली जाते. त्यांनी त्याचा योग्य दखल घेऊन सुरक्षित वाहतूक व्यवस्था अंगिकारावी अशा वाहकांना श्रेणी देण्यात आल्याचे सांगितले.

यावर आयुक्त तथा प्रशासक यांनी सुचना केली की, या प्रणालीव्दारे वाहनचालकांची कामगिरी आकारली जावी, कामगिरीनुसार ग्रेडेशन करुन प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करावी त्यामुळे सुधार करणे योग्य राहील.

३७ ब्लॅक स्पॉट पैकी मनपासह ज्या विभागांतर्गत ही स्थाने येतात त्यांनी यावर आणि २० ग्रे स्पॉटवर मनपाने त्वरीत अहवालानुसार अंमलबजावणी करता यावी यासाठी ‘आयरास्ते’ प्रकल्पाच्या चमूला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.

विविध रोड ओनिंग (रस्त्याची मालकी असलेल्या) विभागासोबत आय रस्ते चमुने समन्वय साधुन आवश्यक तेथे संयुक्त पाहणी करुन उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यास मार्गदर्शन करण्याची सुचनासुध्दा आयुक्तांनी केली.

ग्रे स्पॉट संबंधी अधिक जनजागृती होउन सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी ‘आयरास्ते’ ला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद परिवहन मंत्रालय भारत सरकारचे सदस्य  राजू वाघ यांच्याद्वारे सहकार्य केले जात आहे. त्यांनी संभाव्य अपघातप्रवण स्थळाच्या परिसरात सर्वे करून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीसाठी मानसिकता तयार करून त्यांना २१ दिवस वाहतूक नियमांच्या पालनाची शपथ देण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गावातील सोडून बाहेर गावचा घेतला संगणक चालक मुरमाडी/मुरपार ग्रामपंचायतीचा प्रताप

Sat Jun 25 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुरमाडी/मुरपार या गावात ग्रामपंचायतमध्ये संगणक चालकाची निवड करण्यात आली आहे.परंतु संगणक चालक हा गावातील नागरिक असावा असे नियम असले तरी नियमाची पायमल्ली तुडवत दुस-या गावातील नागरीकाची संगणक चालक पदी निवड करण्याचा प्रकार मुरमाडी /मुरपार गावात घडला आहे. यावर गावातील प्रहार जनसक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना याबाबत निवेदन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com