सौरभ पाटील, प्रतिनिधी
वाड़ी – विज्ञानाने मोठी प्रगती केली. तांत्रिक युगात माणूस जागेवर बसूनच दूरवरची कामे करायला लागला. आचार बदलले. विचार बदलले आणि कृतीही बदलली. खाण्यापिण्यात बदल झाला. बर्गर पिझ्झा आला. मुले शौकीन झालीत. लहान वयात कुणी दारू पितो तर कुणी गांजा आणि पुढे जावून प्रेमाणात… याची परिणीती मोठी वाईट होवू लागली आहे. मुलांच्या हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे परिणाम आईवडिलांना देखील भागावे लागतात. त्यामुळे एक सल्ला द्यासा वाटतो.बायमापहो… मुलांना सांभाळा. त्यांच्याकडे लक्ष ठेवा. आणि ते ठेवण्यची अत्यंत गरज आहे.चांगली संगत मिळाली की, वाल्याचा वाल्मिकी होतो. हे याच देशातले उदाहरण आहे. आज मिसरुड न फुटलेल्या वयात मुले नको ती कृत्य करताना दिसतात. सुसंगती सदा घडो म्हणात ते उत्तम. पण कधी याच संगतीत एखादा वाईटही असतो. या एकाच्या संगतीने वाईट आणि दूरगामी परिणाम मुलांवर होत असतात. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे.. मुलांना दारूच्या व्यसनाबरोबर गांजाचीही ओढ लागली असल्याचे दिसून येते. तरुण पिढी नैराश्य व व्यसनांच्या गर्तेत लोटली जात आहे. ग्रामीण भागात गल्लीबोळापासून तर शहरातील रस्त्या रस्त्यावर व्यसन करणारी ही तरुण मंडळी दिसून येत आहेत. देशाचा कणा समजली जाणारी ही तरुण पिढी, मंडळी व्यसनांच्या गर्तेत ओढली जात आहे. तरूणांचा देश असणाऱ्या बलशाली भारताचे स्वप्न धुळीस मिळत आहे.. तारुण्याच्या उंबरठ्यावर मुलांचे पाय अचानक वाकडे पडू शकतात. यात संशय करण्यासारखे नाही. आज घराघरांत चॅनल, इंटरनेट आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मुलांच्या हातात मोबाईल असतो. व्हाट्सअप, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरणारे संदेशही मुलांना बिघडवू शकतात. वेळीच लक्ष दिल्यास मुलांचे भविष्य गारद होऊ शकते. वारंवार कृती करुन निर्ढावलेली कोवळी मुले तारुण्यात शौक भागविण्यासाठी वाटेल ते करतात. हे चित्र आपण नेहमीच बघतो. यात लक्ष घालून पालकांनी किशोरवयीनांना सावरणे गरजेचे आहे. ज्यांना जन्म दिला. ज्यांच्यावर आपली उद्याची भिस्त आहे. त्या मुलांना नामांकित, महागड्या शाळेत घातलं, त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या, पालक सभेला नियमित हजेरी लावली, की बस्स संपलं. एवढ्याने होत नाही. मायबाप म्हणून त्यांच्या वागण्यातील निरीक्षण नोंद करणे गरजेचे आहे.
मुलगा बिघडला असल्यास त्याच्या बोलण्यात, वागण्यात बदल झालेला असतो. ही नोंद वेळीच घ्यावी. विश्वासात घ्याव. बरे वाईट समजावून सांगावे. तेव्हाच कुठे त्यावर इलाज शक्य आहे. दुर्लक्ष केल्यास वा झाल्यास ती भीषण वादळाची नांदी असले, यात शंका नाही. तेव्हा ‘बापहो.. लेखरं सांभाळा..! मुलांच्या बाबतीत अंतर्मुख व्हा… सजग राहा !