जास्तीत जास्ती नागरिकांना मेट्रोशी जोडावे : डॉ. दीक्षित

 मेट्रोने प्रवास करत सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेची डॉ. दीक्षित यांनी केली पाहणी

नागपूर  : रिच २ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) अंतर्गत ८.३० किमी मार्गिकेचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात असून डिसेंबर महिन्यात महा मेट्रोच्या वतीने या मार्गिकेवर यशस्वीरित्या प्रथम टेस्ट रण देखील घेण्यात आली आहे. या मार्गिकेवरील स्टेशन निर्माण कार्य तसेच रोलिंग स्टॉकची पाहणी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज केली. डॉ.दीक्षित यांनी स्वतः मेट्रोने प्रवास करत रोलिंग स्टॉक, या मार्गिकेवरील प्रत्येक मेट्रो स्टेशन तसेच स्टेशनवर प्रवाश्यानकरता करण्यात आलेल्या सोई-सुविधाचा आढावा घेत त्यांनी पाहणी दरम्यान त्यांनी सांगितले कि, या मार्गिकेवरील जास्तीत जास्ती नागरिकांना मेट्रो रेल प्रकल्पाशी जोडावे तसेच मल्टिमोडेल इंट्रीग्रेशन अंतर्गत नागरिकांन करीता सोई-सुविधा उपल्बध करण्याचे निर्देश दिले.

महा मेट्रोने नेहमीच प्रवाश्याना सोईस्कर व सहज प्रवास करता यावा याकडे लक्ष केंद्रित केले व्यवस्थापकीय संचालक यांनी स्टेशन परिसरातील टॉम रूम,तिकीट काउंटर,एस्केलेटर्स,लिफ्ट,बेबी केयर रूम इत्यादी बाबींची माहिती जाणून घेत आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.

मेट्रो स्थानकांच्या कामाचा आढावा घेत कामाबद्दल डॉ. दीक्षित यांनी समाधान व्यक्त करत पुढील कार्य समोर ध्येय ठेवत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यात. डॉ. दीक्षित यांनी सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने पाहणी दरम्यान सिताबर्डी इंटरचेंज येथे मेट्रो प्रवाश्याशी तसेच मेट्रो कर्मचाऱ्यान सोबत संवाद साधला. या सोबतच मेट्रो ट्रेन मध्ये प्रवाश्यांना करता सोईस्कर व अद्यावत माहिती सतत मिळत रहावी या संबंधी उपाय योजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्याना दिले.

या पाहणी दरम्यान महा मेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टिम) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन)  अनिलकुमार कोकाटे, मुख्य प्रकल्प प्रबंधक (रिच ४) अरुण कुमार,कार्यकारी संचालक (ओ & एम)  उदय बोरवणकर,प्रकल्प संचालक (जनरल कंसलटट)  रामनवास आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.

या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अधिक से अधिक नागरिकों को मेट्रो से जोडे : डॉ. दीक्षित

Wed Feb 16 , 2022
 सेंट्रल एवेन्यू कॉरिडोर का डॉ.दीक्षित ने किया निरीक्षण नागपूर :- रिच 2 (सीताबर्डी से प्रजापति नगर) के तहत 8.30 किमी लाइन का निर्माण कार्य अंतिम चरण में है और इस लाइन पर पहला परीक्षण दिसंबर में महा मेट्रो द्वारा सफलतापूर्वक किया गया। महा मेट्रो के प्रबंध निदेशक डॉ.बृजेश दीक्षित ने रिच 2 का निरीक्षण कर यात्री सुविधाओं का अवलोकन किया। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!