अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात 13 मे व 23 जून रोजी गणखैरा घोटी व बोळूंदा येथे वीज पडली होती. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या तीनही कुटुंबातील कुटुंब प्रमुखांना आज दि. 17 जुलै शनिवारला तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात आमदार विजय रंहागडाले यांच्या हस्ते चार लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. तहसीलदार सचिन गोस्वावी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे राज्य शासनाच्या नैसगिक आपत्ती अतंग॔त प्रत्येकी तीन कुटूंबाना चार लाखाचे धनादेश देण्यात आले.
या प्रसंगी गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले ,तहसीलदार सचिन गोस्वावी, नगरपंचायत चे माजी बांधकाम सभापती आशिष बारेवार, माजी बांधकाम सभापती हिरालाल रहांगडाले,माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, तलाठी अरविंद डहाट, दिलीप कटरे आदी उपस्थित होते
वीज पडल्याने जोशीराम उईके वय 54 वर्ष राहणार बोळुंदा रामेश्वर अनंतराव ठाकरे वय 52 वर्ष राहणार घोटी सुरतलाल जोशीराम पारधी वय 60 वर्षे राहणार गणखैरा या तिघांचा विज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. यातच आज या तीनही कुटुंबप्रमुखांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत राज्य शासनाकडून चार लाखाचा धनादेश देण्यात आले.