महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी शासनास प्रस्ताव – विजय वडेट्टीवार

मुंबई : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी राज्य  शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            मंत्री  वडेट्टीवार  यांनी याबाबत सांगितले कीराज्यातील इतर मागासप्रवर्गातील दुर्बल घटकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना अल्प व्याज दराने कर्ज  देवून त्यांच्या सर्वांगिण विकासात महामंडळाचे बहुमुल्य योगदान आहे त्यामुळे या महामंडळाला  संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

       अंधश्रध्देच्या विळख्यातून मुक्त करूनसमाजाला स्वच्छतेचा व शिक्षणाचा कानमंत्र देण्याचे महनीय कार्य संत गाडगेबाबा यांनी केले आहे. त्यांचे स्मरण रहावे यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी महामंडळाचा नामविस्तार संत गाडगेबाबा यांचे नावे करण्याबाबत सूचना दिल्या  आहेत.त्यास महामंडळाच्या  १५ मार्च २०२२ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Maharashtra Governor presents ‘Life Saver Awards’ to 35 Blood Donation organisations

Sat Apr 9 , 2022
Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Samvedana International Life Saver Awards’ to 35 organisations for their work of organizing blood donation camps at a function held at Raj Bhavan Mumbai on Thursday (7 April).  The Awards function was organized by the National Integrated Forum of Artists and Activists (NIFAA) in association with Maharashtra Entrepreneur Chamber (MEC) with […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com