अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहर व तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून शैक्षणिक क्षेत्रात आपला पाया भक्कमपणे रोवणार्या मेरिटोरियस पब्लिक स्कूलच्या स्थापनेला 10 वर्षांचा कालखंड पूर्ण होत आहे. या दशकपूर्तीनिमित्त शनिवार, 2 जुलै रोजी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.
मेरिटोरियस पब्लिक स्कूलच्या दशकपूर्तीनिमित्त दशकपूर्ती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, कविता वाचन, प्रश्न मंजूषा, गायन व डान्स इत्यादि कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे प्राचार्य तुषार येरपुडे यांनी कळविले आहे. तसेच विद्यार्थी शृंखलेतून MPS@10 ची साक्ष देण्यात आली आहे.