अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडिकोटा आरोग्य केंद्रामध्ये जन आरोग्य समितीची सभा घेण्यात आली यावेळी या सभेचे अध्यक्ष जि.प.सदस्या रजनी कुंभरे, जि.प.सदस्य किरण पारधी, सभापती कुंता पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल घोरमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पलाश शहारे, पं.स. सदस्या प्रमिला भलावी,पं.स.सदस्या वनिता भांडारकर, पं.स. सदस्य जितेंद्र चौधरी, आंगणवाडी सुपरवाईजर पुष्पा भांडारकर, कमलेश आथीलकर सरपंच मुंडिकोटा राजेंद्र चामट सरपंच पांजरा व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावर विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जि.प.सदस्य किरण पारधी यांनी डॉक्टराना सांगितले की पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नागरिकांना डायरीया ,मलेरिया यासारखे आजार होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट करा. आपणास कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास मी तुम्हाला नक्की मदत करेन असे आश्वासन जि.प.सदस्य किरण पारधी यांनी दिले.