नागपूर– उत्तर नागपूरला जोडणारा कामठी महामार्ग पुढील तीन महिण्यासाठी बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून संपूर्ण वाहतूक मंगळवारी बाजार पुलावरून वळविण्यात आल्याने पुलावर तासभर वाहतूक ठप्प होती. वाहतूक पूर्णत विस्कळीत झाल्याने कार्यालयात जाणाèयांना उशिर झाला. वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या गर्दीत अनेकांचे वाहन फसले. विशेष म्हणजे प्रचंड गर्दी होवूनही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले. आता हा त्रास तीन महिणे सहन करायचा असल्याने या मार्गावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली.
उत्तर नागपूरला जाण्यासाठी कामठी मार्ग, जरीपटका येथील इटारसी पूल, तसेच मोमिनपुरा-कडबी चौक असा मार्ग आहे. सध्या या तीन मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. याशिवाय सदर आणि जरीपटका भागाला जोडणाèया इटारसी पुलाचेही बांधकाम होत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर कडबी चौक, मोमिनपुरा, गार्डलाईन मार्गावर पुलाचे बांधकाम होत असल्याने हा मार्गही बराचसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाèया नागरिकांबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मंगळवारी बाजार पुल अरूंद. त्यातही एकाच वेळी वाहनांची गर्दी वाढल्याने चांगलाच गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रांग येथे लागली होती. अनेकांना दुसèया मार्गाचा पर्याय निवडावा लागला. मंगळवारी बाजारात पुलावर वाहतूक जाम झाल्याने पुलावरून जाऊ नका असा सल्ला देत असल्यामुळे इतर वाहन चालक कडबी चौक मार्गे माघार घेऊ लागले. या प्रकारामुळे मात्र इतर वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप झाला. आता हा त्रास तीन महिणे सहन करायचा आहे. म्हणजे तीन महिणे वाहतूक ठप्प असेल. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे
कामठी महामार्ग बंद, पुलावर वाहतूक ठप्प -वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची गरज -तीन महिणे असेल वाहनांची गर्दी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com