संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :- नागपूर भंडारा महामार्गावर वसलेले व कामठी तालुक्यांतर्गत येणारे वडोदा गाव हे आजही हुतात्म्याची किंवा स्वातंत्र्याच्या क्रांतीची आठवण करून देणारे स्थळ आहे.तर या गावातील स्थापित शहीद स्मारक हे स्वातंत्र्याच्या लढाईत अनेकांनी आपली प्राणाची आहुती दिली त्या आठ्वनी कायम ठेवण्याचे काम करीत आहे.सन 1942 च्या चलेजाव आंदोलनाची एक ज्वलंत प्रचिती या शहीद स्मारकातून दिसून येते.
कामठी तालुक्यातील वडोदा येथे क्रांतिवीर मदनलाल बांगडी यांची हिंदुस्थानी लालसेना कार्यरत होती.मदनलाल बांगडीचे पूर्वज हे मध्यप्रदेशातील !परंतु शेती व संपत्ती वडोदा येथे मदनलाल बांगडी सांभाळायचे त्यामुळे मदनलाल बांगडी वदोडाचे रहिवासी बनले.त्यांनी इंग्रज राजवटीच्या काळात हिंदुस्थानी लालसेना स्थापन करून देशसेवा करण्याचे ध्येय बाळगले.स्थानिक शंकर महादेव विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिरातून ते आपल्या लालसेनेद्वारे इंग्रज राजवटीच्या विरोधात कार्य चालवीत होते.नाकाबंदी, रेल्वे लुटणे, पोलीस स्टेशन जाळणे, रस्ताबंदी इत्यादी इंग्रजांच्या विरोधी धोरणात क्रांती करून ही लालसेनासह मदनलाल बांगडी सेना कार्यरत होटीव्ही.अशातच सन 1942 च्या चलेजावच्या काळात मदनलाल बांगडी यांच्या इमारतीमध्ये दारूगोळा असल्याच्या संशयावरून इंग्रजांनी वडोदा येथे बांगडी इमारतीवर हल्ला चढविला .मुख्य चौकातील ठिकाणी झालेल्या चकमकीत वडोदा येथील भैय्याजी खराबे व शाळेत कार्यरत असलेले सेलोकर गुरुजी शहीद झाले.हिंदुस्थान लालसेनेचे सेनापती असलेले मदनलाल बांगडी यांना तुरुंगात जावे लागले तर 50 च्या जवळपास नागरिक जख्मि झाले .काही काळाने देश स्वातंत्र्य झाला .शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या प्रित्यर्थ गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून जागा विकत घेतली व त्या जागेवर शहिदांचे स्मारक बनावे यासाठी त्या काळातील कलेकटरकडे प्रस्ताव सादर करून ती जागा स्मारकासाठी दान करण्यात आली व त्या जागी शहीद स्मारक उभारले.हे शहीद स्मारक स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांची आठवन करून देणारे ज्वलंत स्थळ आहे.