नागपूर –हजारो वर्षांपासून आमच्या वर लादलेली विषमता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच झटक्यात मनू स्मृती जाळून समतेचा दिप प्रजवलीत केला पंरतु आजपण आमच्या मधील मनूचे दहन झाले नाही पोटजात, विविध प्रकारचे गट मोठा नेत्या लहान कार्यकर्ते जवळ घेत नाही भाई भतिजा वाद, परिवार वाद हेच लक्षणे मनूवादाचे समाजात दिसून येतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचे दहन केले होते.पंरतु आम्हाला आंतरिक मनूचे दहन करण्याची वेळ आली आहे.असे प्रतिपादन नामदेवराव निकोसे यांनी केले. ते आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने कास्टाईब कार्यालयात मनू स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते.
कार्यक्रमाला प्रामुख्याने आंविमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, राजूदादा पांजरे, के.एस.पानतावणे, माजी आमदार भोला बढेल, प्रकाश कांबळे के.डी.कांबळे, अँड.महासुर्य बागडे, शालिक बांगर, धर्मा बागडे, मुखतारसिंग सडल, दादाराव पाटील, निरंजन पाटील, जिवन भगत, सुनील बोरकर, शेखर वाघमारे, मनिष तागडे, वैभव आढाव, माया आढाव, गिता दिवेकर, कल्पना गणवीर, भागनबाई मेश्राम, सुनिता सोमंकूवर, हमिदा शेख, जगतपाल गवळी, बंटी आवळे, रामभाऊ वाहणे, सुभाष बढेल, आलम भाई, मनोहर इंगोले, उपस्थित होते सूत्रसंचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले.