एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य

  मुंबई : शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.

 सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील. याशिवाय 5 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती तसेच शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेत असतील अशा विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे.

            सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य असून दंडाचा भरणा करुन सदर सेवेतून त्यांना सूट प्राप्त करता येणार नाही. सन 2021-22 आणि त्यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित उमेदवारांना त्या-त्या वेळचे प्रचलित नियम लागू राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात १ जुलैपासून धडक कारवाई

Fri Jun 17 , 2022
नागपूर : प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात नागपूर शहरात १ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येणार आहे. सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याबाबत केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यानुसार ही कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधित प्लास्टिक बंदी बाबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!