संदीप कांबळे, कामठी
कामठी : – ग्राम पंचायत टेकाडी (को ख) व्दारे ग्राम पंचायत कार्यालय येथे महिला बचत गटाचे रोजगार भिमुख एक दिवसीय प्रशिक्षण थाटात संपन्न झाले.
बुधवार (दि.२०) एप्रिल २०२२ ला ग्राम पंचायत टेकाडी (को ख) च्या कार्यालयात महिला बचत गटा च्या महिला करिता रोजगारभिमुख एक दिवसीय प्रशि क्षण शिबीराचे उदघाटन ग्रा प टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या करूणा भोवते, ग्रा पं सचिव आतिष देशभ्रतार, ग्रा प सदस्या सिंधु सातपैसे, माया मनगटे, सुरेखा कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रशिक्षणा त महिलांना रोजगाराचा संधी निर्माण करणे, बचत गट यांनी तयार केलेल्या मालाचे मार्केटिंग संबधी मार्गदर्श न भारतीय बौद्ध परिषद चिंचोली कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, डॉ प्रज्ञा बागडे, डॉ सुशांत चिमनकार, डॉ विम ल राठोड, डॉ कमलाकर तागडे, संदेश सर, पडोळे सर, शुक्ला सर हयांनी केले. या शिबिराच्या यशस्वितेकरि ता सरपंच सुनीता मेश्राम, विलास सावरकर, मनोज मोहाडे, सुनिता वानखेडे, महिला बचत गटाच्या सर्व सी आर पी आणि महिला बचत गटाच्या महिलांनी बहु संख्येने उपस्थित सहकार्य केले.