आकाश राऊत
खापरखेडा : भानेगाव येथे अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज घडविणारे मानव धर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची १०१ वी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान मंडळाकडून विविध धार्मिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बाबा जुमदेवजीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जुमदेव बाबाच्या जयंतीनिमित्ताने सीताराम लांजेवार यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्याअंतर्गत हवन, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या आध्यात्मिक व समाजिक कार्याचे संदेश, शिकवण, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन आदी समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सेवकांकडून करण्यात आला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला सीताराम लांजेवार, देवराव लांजेवार, मधुकर सरोदे, संजय वाघमारे,राजू बर्वे, मनोहर वाहणे, रेखाबाई लांजेवार, वैशालीताई बर्वे यांच्यासह अनेक सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.