संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
–ठिकठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण
कामठी ता प्र 4 :- सकल जैन समाज कामठीच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या पर्वावर कामठी शहरात काढण्यात आलेल्या भगवान महावीर जयंती शोभायात्रेने कामठीशहर दुमदुमले.दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले . जैन मंदिर लाला ओळीं येथून सजविलेल्या रथावरील भगवान महावीराच्या प्रतिमेचे शेषमल लोढा ओसवाल, युगचंद छल्लानि ,तेजराज चोरडिया यांचे हस्ते पूजा, अर्चना ,आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार सेवक वाघाये ,प्रा डॉ रतनलाल पहाडी, प्रा डॉ अनिल दानी ,खेमचंद सल्लाणी, मनीष ओसवाल ,अजिज जैन, आशिष सलानी, प्रशांत उमाटे ,किशोर बेलसरे ,मनीष ओसवाल, संदीप जैन,कविता जैन ,लता उमाटे ,अर्चना बोबडे ,वीणा दानी उपस्थित होते डीजे ,ढोल ताशे ,बँड, फटाक्यांच्या गजरात निघालेली मिरवणूक लाला ओळीं ,फुल ओळी, काटि ओळीं, फेरुमाल चौक , तंबाखू ओली ,गांधी चौक, पोरवाल चौक ,सत्यनारायण चौक, जुनी ओली मार्गे नगर भ्रमण करीत परवाल ओली येथील जैन मंदिर सभागृहात शोभायात्रेचे समापन करण्यात आले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शोभा यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.