संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हान द्वारा इतिहासतज्ञ प्रा.मा.म. देशमुख यांच्या स्मृती निमित्त समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आदरांजली सभेत भाव भिन्न आदराजंली वाहण्यात आली.
मराठा सेवा संघाचे तज्ञ मार्गदर्शक, सत्य इतिहास तज्ञ प्रा.मा.म. देशमुख यांचे स्मृती निमित्य मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शनिवार (दि.२९) मार्च २०२५ ला सायंकाळी ७ वाजता समाज भवन हनुमान नगर कन्हा न येथे आंदराजंली सभा मराठा सेवा संघ कन्हान मार्ग दर्शक प्रभाकर महाजन यांच्या अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी शिवतीर्थ व प्रबोधनकार महाविद्यालचे संचाल क अभिविलास नखाते, सत्यशोधक समाजाचे अशोक लेकुळवाळे, बीआरएसपीचे विशेष फुटाणे, पंजाबराव मेश्राम, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मायाताई इंगोले, देश मुख सरांचे लहान बंधु मनोहर देशमुख, भाचे विलास भोयर, मांग गारोडी संघर्ष समिती अध्यक्ष नेवालाल पात्रे, भोई ढिवर संघटना अध्यक्ष सुतेश मारबते आदी मान्यवरांच्या हस्ते मा. म. देशमुख सरांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून सभेची सुरूवात करण्या त आली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड चे राकेश घोडमारे, संदीप कुकडे, सामाजिक कार्यकर्ते शेषराव रामटेके, दुर्गा निकोसे, माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके, मोगरध्वज अढाऊ यानी भावनिक आदराजंली व्यकत केली. सिंधु संस्कृती पासुन महापुरूषानी समाज सुधा रणेचे महान कार्य केले. शिव ते शिवाजी पर्यंत उच्च वर्णियानी खरा इतिहास समाजा पुढे सांगितला नाही. परंतु मा. म.देशमुख सरांनी सत्य इतिहास चिकित्सक पणे, संशोधन करून पुराव्यानिशी विज्ञानवादी, सत्य इतिहास वक्तव्यातुन, प्रशिक्षण शिबीरातुन व ब-याच पुस्तकाच्या लेखानातुन बहुजन समाजापुढे मांडुन समाजाचे प्रबोधन संघर्षमय जिवन जगत केले. अश्या त्यांच्या सत्य इतिहासाची कास धरून परिवर्तनवादी होऊ तरच मा म देशमुखाना खरी आदरांजली ठरेल. असे अतिथी नखाते सरांनी मनोगत व्यक्त केले.
अध्य क्षिय मार्गदर्शनांतर सर्वानी उभे राहुन दोन मिनिट मौन धारण करून भावभिन्न आदराजंली वाहली. सुत्रसंचा लन व प्रस्तावणा शांताराम जळते सर हयानी केली. सभेला ताराचंद निंबाळकर, मोतीराम रहाटे, ज्ञानेश्वर विघे, वसंतराव इंगोले, हरिश भेलावे, योगराज अवसरे, राजेंद्र गाडगे, संजय चंहादे, विठ्ठलराव मानकर, आय रहमान, देविदास पेटारे, नामदेव नवघरे, मोहन रंगारी, दिवाकर इंगोले, रजनिश मेश्राम, गज्जु कुंभलकर, राजे श चंहादे, भगवान कडु, यार मोहम्मद कुरेशी, विजय बारके, रघुनाथ पात्रे, दिपक उघडे, केशव पवार, केतन भिवगडे, शैलेश दिवे, शंकर कोंगे, छायाताई नाईक, लताताई जळते, सुषमा खोब्रागडे, सुनिता येरपुडे, सुजाता मेश्राम, ललिता लांजेवार, प्रतिभा चौरे, विजया काळे, सत्यकला मेश्राम आदी सह मराठा सेवा संघ व समविचारी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहु संख्ये ने उपस्थित होते.