स्व. यादवराव भोयर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 2:- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवराव भोयर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ मे २०२२ ला सकाळी ११.३० वाजता संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरातील स्व. यादवराव भोयर मेमोरियल हॉल येथे अभिवादन करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर, सचिव सुरेश भोयर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, अनुराग भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्व. यादवराव भोयर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भोयर यांनी केलेल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या बहुमूल्य कार्याची आठवण करून आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी यावर्षी पासून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांकरीता स्व. यादवरावजी भोयर शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाला फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, प्राचार्या डॉ रूपाली पाटील, प्राचार्या ईशा मुदलियार, प्राचार्य डॉ दिलीप कोहळे तसेच संस्थेचे सदस्य  धिरज यादव, अयूब अंसारी, संस्थेतंर्गत महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ प्राध्यापक गण, शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी पंचायत समिती कार्यालयात महापंचायतराज अभियानाची सुरुवात

Mon May 2 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 2:- काल 1 मे ला महाराष्ट्र दिनी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत महापांचायातराज अभियान . 01 मे 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत राबविण्यात येणाऱ्या अभियानाची सुरुवात कामठी पंचायत समिती कार्यालयातून करण्यात आली. सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी पंचायत समितीचे सभापती. उमेश रडके, प्रमुख उपस्थिती गट विकास अधिकारी अंशुजा गराटे,,सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, पंचायत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com