नागपुर – भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडी, वैद्यकीय आघाडी, स्वच्छ भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व प्रभाकरराव दटके यांच्या जयंती निमित्त भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व प्रभाकरराव दटके यांचा जीवनकार्यावर आधारित व्याख्यान, आणि कोविड योद्धा सन्मान सोहळा काल गुरुवारी शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर महाल,नागपूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार श्री नागो गाणार सर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्री अनिलजी सोले, स्व प्रभाकरराव दटके यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तसेच स्व प्रभाकररावांची जीवनशैली, त्यांचं बँकिंग क्षेत्रातील कार्य व भारतीय जनता पार्टीला नागपुरात अग्रस्थानी लाभलेले स्थान व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यामुळे स्व प्रभाकरराव दटके हे खरे संघर्ष योद्धा होते व नवीन पिढीने त्याच्या कार्याची प्रेरणा घ्यावी असे गौरवोदगार प्रा. अनिलजी सोले यांनी काढले.याप्रसंगी डॉ कोमल काशीकर,डॉ अजित कुमार मलिक डॉ रमा आचरेकर, पियुष बोईनवर,डॉ स्वाती गुप्ता, डॉ रामप्रकाश ममतानी,डॉ पुनीत झवर श्री अरविंद कुमार रतुदी,डॉ महम्मद नाझीर, सौ मनीषा चाफले,श्री संदीप मानकर या डॉक्टर्स चा कोविड योद्धा सन्मान देऊन गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजप महानगर चे महामंत्री श्री रामभाऊ आंबूलकर,भाजप महानगर चे संपर्कप्रमुख श्री भोलानाथजी सहारे, डॉ विंकी रुगवानी,आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संचालन श्री अनिल देव व डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केल तर आभार प्रदर्शन श्री अनिल झोडे यांनी केल.या कार्यक्रमांच यशस्वी आयोजन भाजप सहकारआघाडी चे श्री किशोरजी भागडे, श्री अनिल देव,सी ए गिरीश मुंधडा,भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ गिरीश चरडे, डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ ज्ञानेश धाकूळकर, डॉ प्रणय चांदेकर, भाजप स्वच्छ भारत अभियानचे श्री संदेश कनोजे,अनिल झोडे,सौ प्रणिता लोखंडे, श्रीमती कमला मोहत यांनी सहकार्य केल.
स्व प्रभाकरराव दटके हे खरे संघर्ष योद्धा – प्रा.अनिल सोले यांचं गौरवोदगार..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com